उस्मानाबाद/ प्रतिनिधी

५ हजारांची मागणी करून लाच रक्कम स्वीकारणाऱ्या आरटीओ एजंटला उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई परंडा येथे साेमवारी करण्यात आली.याप्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व त्यांचे दोन मित्र, अशा तिघांच्या टू व्हीलर व फोर व्हीलरचे लर्निंग लायसन्ससाठी प्रत्येकी एक हजार रुपये यापूर्वी खाजगी आरटीओ एजंट ओंकार नागनाथ थोरबोले (२२, रा. मंगळवार पेठ, परंडा) याने स्वीकारल्याचे मान्य करून तक्रारदार आणि त्याच्या एका मित्राचे टू व्हीलर व फोरव्हिलरसाठी ड्रायव्हिंग टेस्टची ऑनलाईन तारीख घेऊन परमनंट लायसन मिळवून देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच सोमवारी पंचासमक्ष ५ हजारांची लाच स्वीकारली. ही कारवाई या विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली.त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके,अविनाश आचार्य, चालक इरफान पठाण यांनी मदत केली.


 
Top