कळंब / प्रतिनिधी

कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे यांना राज्यस्तरीय शांतिदूत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शांतिदूत परिवाराच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना शांतिदूत सेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. शांतिदूत परिवाराचे मार्गदर्शक माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी यावर्षीचा हा पुरस्कार जाहीर केला. शांतीदूत परिवाराचे मराठवाडा प्रमुख प्रा.जीवन जाधव यांच्या हस्ते उस्मानाबादमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांनी आपले विचार मांडले. यावेळी कळंब येथील पत्रकार अशोक शिंदे, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर आदी उपस्थित होते.


 
Top