उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ परिसरामध्ये स्टाफ अकॅडमीच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी निमंत्रित  व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. कर्मचारी व अधिकारी वर्गामध्ये सुसंवाद मजबुत व्हावा, कार्य संस्कृती विकसित व्हावी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रिय व जागतिक विकासाशी निगडित विषयावय चर्चा, विचारविनिमय व्हावा हा मुलभुत हेतु आहे. 

दिनांक 6 मार्च 2021 रोजी   शिक्षणशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डाॅ. महेश कळलावे यांनी नविन राष्ट्रिय शैक्षणिक धोरण 2020 हया विषयावर आपली भूमिका मांडली. नविन शैक्षणिक धोरण हे मुल्य नैतिक शिक्षण व व्यावसाईक शिक्षण यांना जोडणारे आहे, समन्वय साधणारे आहे. राष्ट्रीय व जागतिक प्रगतीला आधारभुत आहे. शिक्षणातुन नैतिक  व सामाजिक मुल्य विद्यार्थी मध्ये रूजून स्वातंत्र, समानता, बधुभावावर आधारित देश महासत्ता बनेल. कार्यक्रमाचे प्रमुख तथा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक डाॅ. दत्तात्रय गायकवाड यांनी व्याख्यानाचे आयोजन हा उपक्रम गतिशिल विकासाला पोषक असल्याचे म्हटले. 

 प्रास्ताविक स्टाफ अकॅडमीचे सचिव, इंग्रजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. गोविंद कोकणे यांनी केले. समारंभासाठी उपकुलसचिव डाॅ. विष्णू करहाळे, डाॅ. जितेंद्र कुलकर्णी, डाॅ. जितेंद्र शिंदे, डाॅ. सुयोग अमृतराव , डाॅ. विक्रम शिंदे, प्रा. वरूण कळसे, प्रा. सचिन बसैये, डाॅ. गणेश शिंदे, श्री विदयाधर गुरव, श्री आनंदगावकर, श्री सचिन रायलवार आदीं उपस्थित होते.


 
Top