लोहारा/प्रतिनिधी 

दिनकर जावळे पाटील अँग्रो फुड प्रोड्युसर कंपनी लि. नागूर, ता. लोहारा यांच्या वतीने दि महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., उस्मानाबादच्या वतीने सन २०२०-२१ खरीपासाठी किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ मुरुम येथील कै.माधवराव पाटील मार्केट संकुलातील गाळ्यामध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी दि.27 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले. 

यावेळी प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद शेख, दिनकरराव जावळे पाटील, दत्ता चटगे, आयुब मासुलदार, सुधीर चव्हाण, रमेश मिणियार, मार्केट कमिटीचे सहसचिव अण्णाराव कुंभार, किरण गायकवाड, नितीन अष्टेकर, या केंद्राचे चेअरमन प्रदीप पाटील, व्यवस्थापक सलीम शेख, अजमेर दाळिंबकर, प्रकाश राठोड, शिवराज पाटील, बालाजी कारभारी, भीमसेन जाधव, अक्रम खान, देवेंद्र येवले, सिध्दू कवाळे आदी, उपस्थित होते. सदर केंद्रावर धान्य आणताना शेतकऱ्यांनी मालातील खडे, माती व काडी कचरा नसलेला व न भिजलेला, मालाची आर्द्रता 12 टक्के पेक्षा कमी असावी, खरेदी केंद्रावर येताना शेतकऱ्यांनी सातबारा व आठ अ उतारा, तलाठ्याचा पीकपेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार कार्ड लिंक असलेल्या बॅंकेच्या चालू पासबुकाची झेरॉक्स, खरेदी केंद्रावर आणलेल्या मालाचे वजन झाल्यावरच ऑनलाईनद्वारे काटा पावतीनंतर शेतकऱ्यांचे पेमेंट ऑनलाईन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. कृपया शेतकऱ्यांनी शेतमाल नमुना अगोदरच तपासून घेऊन शेतमाल केंद्रावर आणावा. तुर हमीभाव सहा हजार तर हरभरा 5100 रुपये प्रती क्विंटल दराने माल घेण्यात येत असून मालाची ऑनलाईन नोंदणी नि: शुल्क करता येईल असे केंद्राचे व्यवस्थापक सलीम शेख यांनी माहिती दिली.


 
Top