तुळजापूर / प्रतिनिधी:-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवनिर्मिती प्रेरणा महिला मंडळ सामाजिक संस्थेच्या वतीने नगरपरिषदेतील सफाई काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार  संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मिनाताई सोमाजी यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी संस्थेच्या सचिव रूपाली घाडगे, अपर्णा बर्दापूरकर, लता सोमाजी व सत्कार मूर्ती जयश्री सरडे, श्रद्धा सरडे, श्रद्धा अंकुटे,कमल धोत्रे, सुमन पवार,  पार्वती राऊत, सुनिता खंदारे, लक्ष्मी डोंगरे, छाया गायकवाड, सारिका कांबळे, सुमन पवार इत्यादी महिलांचा सत्कार करण्यात आला.

 
Top