वाशी / प्रतिनिधी- 

शेतरस्ते मोकळे करणे करीता मा . श्री . कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे आदेशान्वये शेतकऱ्यामधील  रस्त्यावरून होणारे  तंटे मिटून एकोपा नांदावा यासाठी अतिक्रमीत शेतरस्ते मोकळे करणे बाबत आदेशीत करण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने मौ.पारा येथील कुरूंद - उगले - फुरडे पाणंद रस्ता अनेक दिवसापासून बंद पडला होता . मौ पारा ता.वाशी येथील श्री . अंकुश फुरडे व इतर शेतकरी यांनी मौ.पारा येथील कुरूंद - उगले - फुरडे पाणंद रस्ता खुला करणेचे अर्जावरून सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांचे सामंजस्याने व समोपचाराने पाणंद रस्ता करणेबाबत संमती दर्शविली . त्याप्रमाणे मौ.पारा येथील कुरूंद - उगले - फुरडे पाणंद रस्ता अंदाजे १.५ ते २.०० कि . मी . पाणंद रस्ता खूला करण्यात आला . सदर रस्ता १५ वर्षापासून शेतक - यांच्या अंतर्गत वादातून अतिक्रमीत झाला होता श्री.नरसिंग जाधव तहसीलदार वाशी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १०/०३/२०२१ रोजी श्रीमती सुजाता हंकारे निवासी नायब तहसीलदार , तहसील कार्यालय वाशी , तलाठी सजा पारा श्री.संदीप मोरे , श्री.सखाराम अच्यूत भराटे,राजेंद्र काशीद  सरपंच पारा , सर्व शेतकरी , पारा येथील नागरिक प्रत्यक्षात जायमोक्यावर हजर राहून पाणंद रस्ता सर्वांच्या समोपचाराने अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे . तसेच ४० ते ५० शेतक - यांना याचा शेतीकरीता , शेत माल वाहतूक करणेसाठी फायदा झाला आहे . कुरूंद - उगले - फुरडे पाणंद रस्ता मोकळा झालेल्या शेतरस्त्याचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजबूतीकरण केले जाणार आहे . त्यामूळे शेतक यांची अडचण कायमची दूर होणार आहे . शेत रस्ता सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे


 
Top