उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हा परिषद उस्मानाबाद मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकाच रंगाचा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. हा ड्रेस कोड राज्य सरकार ने काढलेल्या परिपत्रकानुसारच केला आहे. 

पुरूष अधिकारी व कर्मचाऱ्यांना पांढरी पॅन्ट व पांढरा शर्ट तर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पांढरी साडी व पांढरा ब्लॉऊज अशा प्रकारचा ड्रेस कोंड ठेवण्यात आला आहे. या ड्रेस कोडचे कांही कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. तर कांही कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. कांही कर्मचाऱ्यांनी पांढरे कपडे लवकर मळतात त्यामुळे रंग बदलावा, अशी मागणी केली आहे.

 ड्रेस कोड लागू झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फंड, उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासोबत अधिकारी, कर्मचारी वर्गाने फोटे सेशन केले आहे. 

 
Top