उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद शहरातील बार्शी नाका  परिसरातील एका विवाहित महिलेवर पोलीस कर्मचारी  हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला  होता. त्यामुळे सदर महिलेने  २ मार्च रोजी उस्मानाबाद शहरात आत्महत्या केली होती. आता त्याच पीडित महिलेच्या नवऱ्याने रविवार दि. ७ मार्च रोजी सायंकाळी लातूर जिल्हयातील औसा तालुक्यात आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

मयत महिलेच्या पतीने रविवार दि. ७ मार्च रोजी औसा तालुक्यातील टाका परिसरातील झाडाला फासी घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भात भादा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत महिला आत्महत्या प्रकरण उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात नोंद झाल्यामुळे शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांना विचारले असता त्यांनी आपल्याला पण समजले असून वरिष्ठ अधिकाऱ्यास या संदर्भात माहिती मिळाली आहे, असे सांगितले. पीडित महिलेच्या नवऱ्याने रविवारी सायंकाळी टाका ( ता. औसा  जि. लातूर) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली असून,त्यात तिघांची नावे  आहेत.

या पोलीस कर्मचाऱ्यास बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. त्यानंतर मयत महिलेच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

 
Top