उस्मानाबाद/ प्रतिनिधी

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त देवकते गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच जयंतीनिमित्त देवकते गल्ली परिसरातील रहिवाशी ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत ऑनलाइन कोरोना लसिकरण नाव नोंदनी कार्यक्रम घेण्यात आला व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रिक्षाचे मोफत आयोजन करण्यात आले.

यावेळी अग्निवेश शिंदे, प्रा.लांडगे सर,नगरसेवक बाळासाहेब काकडे, राहुल काकडे,रवी   वाघमारे, इंद्रजित देवकते,मंगेश   देवकते, अशोक सोलंकर, संतोष देवकते, रामेश्वर देवकते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक नरसिंह मेटकरी, रवी देवकते ,अमित देवकते,  ओंकार देवकते, संदीप देवकते , रोहन महानवर, हर्षद ठवरे, सौरभ देवकते, अरविंद देवकते, कुणाल महानवर व देवकते गल्ली मित्र परिवार उपस्थित होता.

 
Top