उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे होणार्‍या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी उस्मानाबाद येथील कु.सोयबा तौफीक सिद्दीकी हिची निवड झाली आहे. सोयबा ही उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनची खेळाडू आहे.

 पुणे व पनवेल येथे 17 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनची कु. खेळाडू सोयबा तौफिक सिद्दीकी हिने चमकदार कामगिरी करुन महाराष्ट्रात 9 वा क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेचा निकाल 28 फेब्रुवारी रोजी घोषित झाला. राज्यस्तरीय स्पर्धेतील यशानंतर आता 22 मार्च 2021 रोजी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होत असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  सोयबा ही सामान्य कुटुंबातून पुढे आलेली खेळाडू असून तिच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अझीम शेख, तसेच तौफीक सिद्दीकी, फेरोज पल्ला, राकेश पवार, चेतन सपकाळ, आकाश मोरे, आकाश बागल यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिकांनी तिचे कौतुक केले आहे.


 
Top