परंडा / प्रतिनिधी : - 

दि.४ महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोती अभियान उमेद अंतर्गत परंडा तालुक्यातील अनाळा येथे उडाण प्रभागसंघाची स्थापना दि.२७ रोजी करण्यात आली.अनाळा प्रभागाअंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांमधून प्रभाग संघाचे अध्यक्ष -सचिव - कोषाध्यक्ष म्हणून निवडी करण्यात आल्या. यामध्ये प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी आंदुरी येथील रोहिणी धनाजी बारसकर, सचिवपदी कार्ला येथील भागिरथी नामदेव झिरपे, कोषाध्यक्षपदी पिस्तमवाडी येथील रेश्मा अण्णा चव्हाण तर लिपिका म्हणून पिंपरखेड येथील मोनिका भारत कोळी यांची निवड करण्यात आली. 

निवडीचा कार्यक्रम येथील शासकिय गोदामात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच आंबिका जोतीराम क्षिरसागर या होत्या तर प्रमुख पाहुने म्हणून महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखाधिकारी सावंत हे होते. यावेळी  शाखाधिकारी सावंत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. उमेद अंतर्गत येणाऱ्या स्वं.स. समुहाना मदत करून येणाऱ्या अडचणी दूर करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के, प्रभागसंंघ बांधणी निरीक्षक नाईक, प्रभाग समन्वयिका प्रिया पाटील, प्रभाग समन्वयक माळी , चांदणे, आशा स्वयंसेेविका अनिता क्षिरसागर, पत्रकार, निशिकांत क्षिरसागर, यांच्या्सह प्रभागातील अनाळा, रोहकल, कंडारी, कार्ला्, साकत, पाचपिंपळा, राजूरी, कुुभेफळ, खासापूरी, मलकापूर, पिस्तमवाडी, आंदोरा आदी गावातील ग्रामसंंघाच्या महिला मोठया संख्यने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाग समन्वयक प्रिया पाटील,प्रेरिका नौशाद शेख यांच्यासह उमेद अंतर्गत पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


 
Top