तेर/ प्रतिनिधी 

उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी य़ेथील प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांना दिले आहे. 

 समुद्रवाणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत जिल्हा परिषदेच्या सदस्या सक्षणा सलगर यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेली आहे. निवडून आल्यापासून सातत्याने या इमारतीचे नूतनीकरण, इमारत नवीन व्हावी व जनतेला योग्य अशा आरोग्याच्या सुविधा मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. आता सुसज्ज अशी इमारत , वैद्यकीय अधिकारी यांची रहण्याची जागा ही बांधकाम पूर्ण होत आहे. याचाच एक भाग म्हणून बाकीचे कंपाउंड वॉल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सक्षणा सलगर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश  टोपे  यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यासाठी निधी मंजूर करू असे आश्वासन टोपे यांनी दिले आहे.

 
Top