परंडा/ प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील हिंगणगांव (खु ) येथील जागृत देवस्थान श्री कानिफनाथ यात्रा दि..०२ एप्रिल शुक्रवार रोजी संपन्न होणार होती परंतू कोरोना संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. छबिना काठीच्या देवाचे दर्शन सालाबादप्रमाणे या वर्षी शुक्रवार 

रोजी सर्व बाहेर गावातील नाथ भक्तांनी आपापल्या घरीच थांबून दर्शन घ्यावे असे आवाहन हिंगणगांव ग्रामस्थांच्या वतीने भागवत बिडवे यांनी केले आहे.

कोरोनांचे संकट वाढल्यामूळे महाराष्ट्रातील सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत तरी सर्व बाहेर गावातून येणाऱ्या नाथ भक्तांनी सहकार्य करावे असे आवहान करण्यात आले आहे.

 

 
Top