उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे (१७ लक्ष रु.) लोकार्पण पवनराजे कॉम्प्लेक्स,  उस्मानाबाद  येथे जिल्ह्याच  खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, भारत काका देशमुख,उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, जि.प.सदस्य बालाजी बप्पा जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील आदींच्या हस्ते संपन्न झाले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्‍य होते. रुग्णांची वेळेवर ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. रुग्णांची गरज ओळखून त्यांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी विविध सुविधांची गरज आहे.  त्यात प्रामुख्याने रुग्णवाहिकांची उपलब्धता महत्वाची आहे. रुग्णांची ही गैरसोय दूर व्हावी, या अनुषंगाने नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडून व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या अशा दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यातील गरजू रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतील. 

याप्रसंगी डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, नगसेवक सोमनाथ गुरव, शहरप्रमुख पप्पू मुंढे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, भिमा आण्णा जाधव, बालाजी सुरवसे, दिलिप जावळे, विधानसभा संघटक तथा डिकसळ चे उपसरपंच सचिन काळे, पंकज पाटील, ओंकार आगळे आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top