उस्मानाबाद/ प्रतिनिधी

  सांजा (ता. उस्मानाबाद) येथे ग्रामीण विकास कार्यक्रम (2515) योजने अंतर्गत यशवंत नगर गणपती मंदिर समोरील रस्ता, ज्ञानेश्वर कॉलनी येथिल ओम सूर्यवंशी यांच्या घरा जवळ सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून सिद्धार्थ नगर भागातील (बुद्धविहार) समाजमंदिराचे लोकार्पण   खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

 प्रथमतः गावाच्या नवनिर्वाचित सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतिष बप्पा सुर्यवंशी, दक्षता समितीचे राकेश सुर्यवंशी, ग्रा.पं. सदस्य श्रीमती सुनंदा हरिभाऊ कचरे, शोभा शंकर गुंडे, पुष्पा भागवत बळी, मनिषा अनिल सुर्यवंशी, ललिता चांदणे, तांबोळी अमीना, शांताबाई सुर्यवंशी, नामदेव राठोड, प्रविण जकाते आदींचा सत्कार करून पुढिल सामाजिक कार्यास  खासदार, आमदार यांनी शुभेच्छा दिल्या.

 खासदार यांनी आपल्या भाषणात आपण स्थानिक खासदार निधी मधून जिल्हा रुग्णालयास एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मिळालेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका शिवसेना संपर्क कार्यालयास सुपूर्द केली आहे. सदरील रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज असून नक्कीच या रुग्णवाहिकेंचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचारासाठी उपलब्ध होईल, असे सांगितले.

  याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, माजी ग्रा.पं. सदस्य गफूरभाई काझी, हनुमंत सूर्यवंशी, अनिल सुर्यवंशी  मोहन काका सुर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद सुर्यवंशी, तंटामुक्ती उपाध्यक्ष नितीन टेलर, श्रीकांत आबा सूर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी, अमर शिंदे , गोटू सुर्यवंशी, अरुण काळे, आरिफ तांबोळी, योगेश सुर्यवंशी, महेश कचरे, धावारे आबा, नितीन मगर, गुड्डे सर, फुलचंद गायकवाड, गावचे शाखा प्रमुख, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top