उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील वडगाव (सि.) येथील सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा व इतर कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती श्री. सिध्देश्वर मंदिर देवस्थान समितीने दिली आहे.

उस्मानाबाद शहराजवळील वडगाव येथे सिध्देश्वराचे प्राचीन देवस्थान आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यातील चारही सोमवारी तसेच महाशिवरात्रीस दर्शनासह अभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. गतवर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील सोमवारच्या यात्रा रद्द केल्या होत्या. आताही कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाशिवरात्री निमित्त होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय सिध्देश्वर देवस्थान समितीच्या पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्व कार्यक्रमांना टाळून केवळ धार्मिक कार्यक्रम तेही कोरोना महामारीच्या अनुशंगाने प्रतिबंधक उपाय पाळून करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने मंदिर संस्थानला दिले असल्याची माहितीही संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.,


 
Top