तुळजापूर / प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाने दि. ८ मार्च रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत बाजू भक्कमपणे न मांडल्यास राज्यभर बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. याबाबत तुळजापूर तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

युवकांना बसला असून अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांना नोकरीपासून तसेच वैद्यकीय प्रवेशापासून वंचित रहावे लागले आहे. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी दि. ८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार असून या सुनावणीत राज्य शासनाने मराठा आरक्षणाची बाजू पूर्ण ताकदीने आणि भक्कमपणे मांडण्याची मागणी मराठा समाजातून होत आहे. दि.८ मार्चच्या सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती न उठल्यास राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर बोंबा मारो आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. यावेळी सज्जन साळुंके, जीवन इंगळे, कुमार टोले, प्रशांत अपराध, प्रशांत इंगळे, प्रतिक रोचकरी, धैर्यशिल कापसे, अर्जून साळुंके, महेश गवळी, महेश चोपदार, अण्णासाहेब क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

 
Top