उस्मानाबाद / प्रतिनिधी :- 

 कोरोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मानवतेचा संदेश ग्रुपतर्फे ‘रिच अ‍ॅन्ड टीच’ (पोहचा आणि शिकवा) उपक्रमांतर्गत कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मोटीवेशनल स्पीकर अर्शद सय्यद यांनी सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे महत्व, तसेच इंग्रजी व इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे यासह विविध विषयांवर संबोधीत केले. समाजात वावरताना मानवतेची शिकवण किती गरजेची आहे, याविषयीही रिज़वान शेख यानी सखोल मार्गदर्शन केले व परीक्षा घेऊन बक्षिस वितरण करण्यात आले.

उस्मानाबाद शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. घाडगे, सुलतान मशायक, इरफान तांबोळी, अब्दुल्लाह पठाण, इरफान सय्यद, सद्दाम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना उमर खान यांनी केले. आभारप्रदर्शन संस्थाचालक हाफीज अलीमोद्दीन यांनी केले.

 

 
Top