उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू औताडे,     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील , जिल्ह्याचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांच्या आदेशानुसार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु यांनी उस्मानाबाद सेवा दल काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मेहराज शेख यांची नियुक्ती केली आहे.

सदर निवडीचे पत्र त्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अवधूत क्षीरसागर, सतीश इंगळगी, अविनाश जाधव आदींची उपस्थिती होती.

 
Top