परंडा / प्रतिनिधी :- 

ज्यांना पोटभर खायला मिळत नव्हते ते आज या महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.केवळ त्यांची जिद्द आणि चिकाटी होती म्हणून ते शिकले आणि अधिकारी झाले असे मत परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जिज्ञासा स्पर्धा परीक्षेचे राज्य समन्वयक तथा जळगाव येथील डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्रा.डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी व्यक्त केले. 

महाविद्यालयामध्ये करियर आफ्टर बी होक  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जयेंद्र लेकुरवाळे जळगाव तसेच भूमी अभिलेख कार्यालय परंडा येथील अधीक्षक शीतल लेकुरवाळे यांची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर बी होक चे नोडल अधिकारी डॉ.महेशकुमार माने,प्रा संतोष काळे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे हे उपस्थित होते.यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.राऊत बी.बी.,डॉ.अक्षय घुमरे ,डॉ.प्रकाश सरवदे, डॉ.सचिन चव्हाण ,डॉ.विशाल जाधव ,प्रा.दीपक तोडकरी ,प्रा.विद्याधर नलवडे ,डॉक्टर कृष्णा परभणे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील  विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेशकुमार माने यांनी केले.अधीक्षक शीतल लेकुरवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाले की महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जातात तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केले आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा व स्वतःचे व या महाविद्यालयाचे नावलौकिक करावे. पुढे बोलताना डॉ.जयेंद्र लेकुरवाळे म्हणाले की केवळ परीक्षेमध्ये मार्क मिळविणे म्हणजे शिक्षण नव्हे तर कौशल्य महत्त्वाचे आहे इथे शिक्षण आणि कौशल्याचा कोठेही अर्थाअर्थी संबंध दिसून येत नाही.आपणास मोठे व्हायचे असेल तर इथे बसून अभ्यास करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या महाविद्यालयामध्ये केली आहे.त्यासाठी पुणे मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची काही गरज नाही.असे मत डॉ.लेकुरवाळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा.संतोष काळे यांनी मानले.


 
Top