उस्मानाबाद / प्रतिनिधी:

जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या स्वयंपादीत उत्पन्नातील पाच टक्के दिव्यांग सेस योजनेअंतर्गत 2020-2021 या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थानी विहित नमुन्यातील अर्ज घेवून जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे दि.18 मार्च-2021 या विहित मुदतीत सादर करावे,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


 
Top