उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलांना ब्युटी पार्लर च्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसिद्ध स्वयंरोजगार मुखी प्रशिक्षण संस्था, सौंदर्य एजन्सी व लीलीज ब्युटी पार्लर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये लीलीज ब्युटी पार्लर च्या संचालिका सौ. ज्योती प्रसाद राजेनिंबाळकर यांनी उपस्थित महिलांना दोन महिने ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले.

 प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पाटील, उषा गाढवे, सारिका पारिख, प्रेरणा भुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिलांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसिद्धम  स्वयंरोजगारमुखी प्रशिक्षण संस्थेमार्फत ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


 
Top