कळंब. ( शिवप्रसाद बियाणी

 तळागळातील जनतेचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च संसदेमधे ठणकावून मांडणाऱ्या व सर्वासामान्य जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ न बसणाऱ्या व सांसदरत्न पुरस्काराने संपूर्ण भारत देशात सर्वाधिक पाच वेळा सन्मानीत केल्या गेलेल्या व आता ‘ संसद महारत्न ‘ पुरस्कारासाठी पाञ ठरलेल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय खा. म्हणजेच सुप्रियाताई सुळे आहेत व त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत खासदार डॉ.अमोल कोल्हे हे काम करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे  जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके यांनी केले.

 खा. सुप्रियाताई सुळे यांना संसद महारत्न तर खा. डॉ.अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलच्या वतीने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  .राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली व याची संपूर्ण जबाबदारी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील  वक्ते प्रदीपजी सोळुंके  यांना देऊन  पक्षाची ताकद वाढविण्याचे काम  केले आहे.हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पदाधिकार्यांनी फक्त पद घेऊन शांत न बसता जबाबदारीने पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहीजेत आसेही प्रा.सुशील शेळके यांनी मत व्यक्त केले.

  याप्रसंगी  प्रा.रणजीत दांगट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  सचीन रणखांब यांनी सुञसंचलन तर अमोल औताडे यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी तुळजापूर तालुकाध्यक्ष ञिगुणशील साळुंके,अँड.दादासाहेब जानकर,अमोल पाटील यांची उपस्थिती होती.


 
Top