उस्मानाबाद / प्रतिनिधी - उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर मंत्री यांचे (वय 92) शनिवारी सायंकाळी 6.30 सुमारास दुःखद निधन झाले आहे. ‘दैनिक संचार’साठी उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी 35 वर्षांहून अधिक काळ योगदान दिले आहे. उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुली, नातवंडे, असा परिवार आहे.

 
Top