उमरगा / प्रतिनिधी

उमरगा नगरपरिषदेचा २०२१-२२ या अार्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या सभेत ९ विरुद्ध एक ने मंजूर झाला. यावेळी ६ लाख २६ हजार ५२८ रुपयांच्या शिल्लकीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. या सभेला २५ पैकी १६ सदस्यांनी हजेरी लावली.

नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्थसंकल्पाची सभा बोलावली होती. नगराध्यक्षांना कोंडीत पकडण्यासाठी सभेला जॉइन होण्याबाबत सदस्यात चर्चा सुरू झाली. सत्ताधारी काँग्रेस सदस्यांनी वरिष्ठांचा आदेश आल्याने सभा जॉइन केली. सत्तेतील सहयोगी भाजपचे उपाध्यक्ष, सदस्यही सभेला जॉइन झाले. २५ पैकी १६ सदस्य जॉइन झाल्याने सभेचा कोरम पूर्ण झाला. त्यात चार सदस्यांनी अर्थसंकल्पात मत नोंदवले नाही. दोन स्विकृत सदस्यांचे मत ग्राह्य धरले जात नाही. उर्वरित दहापैकी नऊ जणांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संजय पवार यांनी आक्षेप घेतला. मात्र, काँग्रेसचे सदस्य विक्रम मस्के यांनी तो फेटाळला होता.

सभेत २०२१-२२ वर्षासाठी महसुली जमा १२ कोटी २० लाख ५२ हजार २४८ रुपये तर महसूल खर्च १२ कोटी १८ लाख पाच हजार ७२० रुपये अंदाजीत मांडण्यात आला. तसेच भांडवली जमा ५३ कोटी ७० लाख ३० हजार, अशी एकूण ६५ कोटी ९० लाख ८२ हजार २४८ रुपयांची अंदाजित जमा दाखवली. एकुण खर्च ६५ कोटी ८४ लाख ५५ हजार ७२० दाखवला. जमा रकमेतून खर्च वजा जाता ६ लाख २६ हजार ५२८ रुपये शिल्लक दाखवण्यात आले आहे.

 
Top