उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कोरोना विषाणूने बांधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हयात उभारण्यात आलेल्या सीसीसी (CCC) डीसीएच (DCH) आणि डीसीएचसी (DCHC) च्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित रहावा यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी राजकुमार माने यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील CCC,DCH आणि DCHC च्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित रहावा, या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी नियुक्त केलेल्या समन्वय अधिकारी यांच्या कामकाजाचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करण्याकरीता ही नियंत्रण अधिकारी  म्हणून श्री.माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनची मागणी,उपलब्धता,आवश्यकतेनुसार पुरवठा आदीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनच्या पुरवठादारांच्या जिल्ह्यातील कारखान्यांना भेटी देणे आणि त्यांच्याशी समन्वय ठेवून मागणी करणे, आवश्यकतेनुसार ऑक्सीजन पुरवठा नियमित आणि सुरळित सुरु राहील याची दक्षता घेणे.जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यांतील ऑक्सीजन पुरवठादारांशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार मागणी नोंदविणे तसेच या मागणीनुसार विहित वेळेत ऑक्सीजनचा पुरवठा होईल याअनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे आदी कामे नियंत्रण अधिकारी म्हणून श्री.माने यांनी करावयाची आहेत.याबाबत नियमितपणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दैनंदिन अहवाल सादर करणे आवश्यक आहे.


 
Top