उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-येडशी महामार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.

नियम ३७७ च्या अधिसूचनेनुसार केलेल्या मागणीत म्हटले आहे की, हा महामार्ग लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा असून, महामार्गाच्या १६३ किमी पैकी १०१ किलोमीटर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून जातो.महामार्गाची स्थिती वाहतुकीस अनुकूल नसल्याने टेंभुर्णी-बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. येडशी ते लातूर हा रस्ता पंधरा मीटरने रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी टेंभूर्णी-येडशी या रस्त्याच्या दहा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी व जनतेच्या सोयीसाठी हा महामार्ग पंधरा मीटर रूंदीवर करणे आवश्यक आहे.


 
Top