कळंब / प्रतिनिधी - 

तालुक्यातील हसेगाव (के) येथील पांडुरंग गोरोबा यादव यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षे होते. ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक होते. तसेच त्यांनी सेवानिवृत्तीनंतर नॅचरल उद्योग समुहाच्या एन साई मल्टीसटेट बॅंकेचे कळंब शाखेचे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कुशल कार्यशैलीमुळे ते जिल्हाभरातील शेतकर्‍यांच्या परीचयाचे होते. 

त्यांच्या या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, सुन, मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर हसेगाव येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सकाळी रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.

 
Top