उस्मानाबाद / प्रतिनिधी:

कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कोविडच्या मोफत तपासणीची सोय विविध दिवशी व्यावसायिकांसाठी करण्यात आली आहे. संबंधित व्यावसायिक, कामगार आदींनी विहित केलेल्या दिवशी आपली मोफत कोविड तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन तहसीदार गणेश माळी यांनी केले आहे.

 दिलेले वार आणि व्यावसायिकांची माहिती अशी - सोमवार - किराणा, जनरल दुकानदार आणि कामगार, मंगळवार - सराफ दुकानदार, कारागीर आणि सर्व कपड्याचे दुकानदार, बुधवार - हॉटेल, रेस्टॉरंट, बिअरबार मालक, कामगार, भाजीपाला आणि फळविक्रेते, गुरुवार - मेडिकल, सर्व मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स, शुक्रवार - नगर परिषद सर्व सफाई कामगार, शनिवार - कृषी व शेती विषयक सर्व आस्थापना (अवजारे, खते, साहित्य ) आणि रविवार - उर्वरीत इतर सर्व आस्थापना अशाप्रकारे सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी.


 
Top