तुळजापुर / प्रतिनिधी- 

तालुक्यात सध्या वीज थकबाकी बिला पोटी वीजतोडणी व डीपी बंद करण्याचा सपाटा चालु असल्याने शेतकऱ्यांच्या रबी पिकांसह भाजीपाला वाळुन जात असल्याने वीजबिल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी देवराज मिञमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटलं आहेकि तालुक्यात महावितरण कडुन वीजथकबाकी बिला पोटीवीजतोडणी व चालू आहे यामुळे रबी पिकातील भाजीपालास पाणी देणे कठीण बनल्याने भाजीपाला   वाळुन जात आहे.तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवास असल्याने जनावरांच्या पिण्याच्या  पाणी प्रश्न समोर उभा टाकला आहे.वीज तोडणी मुळे शेतकरी संकटात आल्याने सक्तीची वीजवसुली थांबवावी अशा मागणी चे निवेदन अँड उदय भोसले यांनी दिले.


 
Top