तुळजापुर / प्रतिनिधी- 

कोरोना च्या दुसऱ्या टप्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता  नगर परिषदेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार व्यापारी, भाविक, पुजारी बांधव यांच्या मागील तीन दिवसांपासून कोरोना कोविड-19 ची तपासणी सुरुवात करण्यात आलेले  असून आज पर्यत तीन दिवसात २६२ नागरिकांची रँपिड अँन्टीजेन तपासणी केली असता सहा जण यात पाँजिटीव्ह आढळले आहेत.

 पहिल्या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय इमारतीच्या खालील बाजूस घेतलेला टेस्टमध्ये 87 लोकांची टेस्ट करण्यात आली त्यामध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आलेला नाही.  दुसऱ्या  दिवशी दीपक चौक येथील हनुमान मंदिरामध्ये टेस्ट घेण्यात आली येथे एकूण 100 लोकांची तपासणी केली असता त्यामध्ये 05 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या.शुक्रवार दि.२७रोजी  डुल्या हनुमान मंदिर कमानवैस  येथे तपासणी करण्यात आली आतापर्यंत एकूण 75 रुग्णांची तपासणी पुर्ण करण्यात आलेली असून त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे

 श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष शी चर्चा करुन श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात एक  दिवस रँपिड अँन्टीजन तपासणी शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहीती मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी दिली 

कोरोना ची जास्तीत जास्त तपासणी करण्यात याव्यात यासाठी नगरपरिषद  जनजागृती दररोज करीत असुन तपासणी केंद्राचे नियोजन  नगरपरिषद करीत असुन आरोग्य विभागाचे मंडळी कोरोना तपासणी करीत आहेत.  सदर कैम्प यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी आशिष लोकरे, व सर्व नगरपरिषद कर्मचारी, आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

 
Top