कळंब / प्रतिनिधी-

जुनी पेन्शन हक्क संघटन कळंब च्या वतीने  कळंब उस्मानाबादचे आमदार कैलास  पाटील यांची शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे भेट घेऊन विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली असुन निवेदन देण्यात आले 

 जिल्ह्यातील प्रलंबित वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव यापैकी फक्त 42 प्रस्ताव निकाली काढले. याबाबत आमदार यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी मोहरे साहेब यांना फोन करून सर्व प्रस्ताव एप्रिल अखेर निकाली काढावा. अशी सूचना दिल्या. त्याप्रमाणे शिक्षणाधिकारी मोहरे साहेब यांनी उर्वरित राहिलेल्या सर्वांचे प्रस्ताव मागवून सर्व प्रस्ताव  एप्रिल अखेर  निकाली काढणार आहोत. असे सांगितले.माननीय आमदार महोदय यांना खाजगी संस्थेत कार्यरत बांधवांचे मागील हिशोब न देताच NPS फॉर्म भरून घेतले जात आहेत. असे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी वेतन अधीक्षक पवार साहेब यांना  लागलीच फोन करून मागील पूर्ण हिशोब देण्यात यावा व त्यानंतरच एनपीएस फॉर्म करावेत अशा सूचना केल्या. यावेळी वेतन अधीक्षक यांनी आम्हाला आमचा हिशोब तयार असून उपसंचालक यांच्याकडे सहीसाठी पाठवण्यात येणार आहे. परंतु माननीय संचालक साहेब यांच्या आदेशानुसार आम्हाला कार्यवाही करावी लागेल, असे सांगितले.

त्यानंतर आमदार महोदयांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.कळंब तालुक्यातील मयत बांधव  उद्धव शिवाजी वाघमारे यांच्या सानुग्रह अनुदानाची फाईल मंत्रालयामध्ये ग्राम विकास कक्ष अधिकारी यांच्या टेबलवर आहे.याबाबत पाठपुरावा करावा, अशी विनंती केली असता आमदार महोदयांनी मुंबईला गेल्यानंतर नक्कीच याचा पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले. तसेच कै. टिप्परसे सर यांची सेवा एक महिना जास्त झाल्यामुळे सानुग्रह अनुदानाची फाईल परत पाठवण्यात आलेली आहे. याबाबत त्यांना सांगितले, असता त्यांनी याबाबत संबंधित सचिव यांना सुधारित परिपत्रक काढण्यासाठी पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले.

निवेदनावर कळंब तालुका अध्यक्ष नारायण बाकले, तालुका कार्याध्यक्ष सुनील बोरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत घुटे, सुधाकर सुरवसे दत्तात्रय जाधवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top