परंडा / प्रतिनिधी : -

 दि. २४- परंडा तालुक्यातील  रुई, भांडगांव, पिंपरखेड , खानापूर या गावामध्ये उमेद अभियान व बँक ऑफ इंडिया-  शाखा परंडा, महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा -माणकेश्वर   यांच्या संयुक्त विद्यमाने कर्ज वाटप मेळावा दि. २३ रोजी घेण्यात आला. 

या मेळाव्यात  रुई येथील  १२ स्वं.स. समुहांना प्रत्येकी  २ लाख बँक ऑफ इंडिया शाखा - परंडा शाखेच्या वतीने  कर्ज मंजुरीचे पत्र समुहांना देण्यात आले. पिंपरखेड येथील ४ समुहांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर खानापूर येथील ३ समुहांना प्रत्येकी एक लाख रुपये मंजुरीचे पत्र देऊन फाईलवर महिलांच्या सह्या घेण्यात आल्या. बँक ऑफ इंडिया शाखेकडून एकुण ३१ लाख रुपये तर महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने ०९ लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. य भांडगांव येथे  महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने ९ समुहांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. या मेळाव्यात एकुण ४० लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र समुहांना देण्यात आले. समुहातील  सदस्यांचे विमा , श्रमयोगी योजना, अटल पेन्सन आदी योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी  बँक ऑफ इंडियाचे बँकेचे शाखा व्यवस्थापक वरूनराजे गोरे , अनुप  थमूल,  फिल्ड ऑफिसर वाडकर, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा व्यवस्थापक भुषण व्यवहारे, श्रीराम टेकाळे  ( बँकमित्र )उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक माणिक सोनटक्के, प्रभाग समन्वयक  विजय गवळी, बँक सखी  लिमकर प्रेरिका महानंदा कवठे , सुनिता चौधरी, सारिका अंधारे यांच्या सह महिला मोठया संख्येने उपस्थि्त होत्या. मेळावा यशस्वी्तेसाठी प्रभाग समन्वयक विजय गवळी यांनी परिश्रम घेतले.


 
Top