परंडा / प्रतिनिधी : -

 पुणे येथील अक्षर भारती या सामाजिक संस्थेने उस्मानाबाद जिल्यातील 500 गरजू विद्यार्थींना स्कूल बँगचे वाटप केले. अक्षर भारतीने आजवर परंडा तालुक्यातील 40 शाळांना ग्रंथालय देवून विद्यार्थींमध्ये वाचणाची गोडी निर्माण केली आहे त्याचबरोबर 25 शाळांमध्ये संगणक साक्षरचे वर्ग सुरू करून त्यांच्यामध्ये संगणक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

कोविड -19 मुळे शाळा बंद असतानासुध्दा संगणक साक्षरतेमुळे विद्यार्थींना शिक्षणासाठी खूप मोठा फायदा झाला आहे. शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थींना त्यांच्या परीस्थितीमुळे, पालकांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे शैक्षणिक साहित्य घेणे, स्कूल बँग घेणे या गोष्टी अवघड होऊन बसल्या अशा परीस्थितीमध्ये  विद्यार्थींना शैक्षणिक सुलभतेसाठी अक्षर भारतीने मदतीचा हात पुढे करत जिल्यातील जवळपास 500 गरजू विद्यार्थींना प्रत्यक्ष 25 शाळांना भेटी देवून स्कूल बँगचे वाटप केले. या कामी विनोद सुरवसे वैजिनाथ सावंत ,बाळासाहेब घोगरे, तानाजी तरंगे, अमोल अंधारे यांनी उत्कृष्ट नियोजन करून गरजू विद्यार्थीं पर्यत प्रत्यक्ष मदत पोहोच केली. 

  उस्मानाबाद जिल्यातील विद्यार्थींना सदर मदत उपलब्ध करून देण्यासाठी अक्षर भारतीचे अध्यक्ष भानूदासजी आभाळे, राज्य समन्वयक संतोष शेळके व गणेश वागसकर यांचे सहकार्य लाभले. विविध संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू विद्यार्थींना शैक्षणिक मदत मिळवून दिल्याबद्दल परंडा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ. अनिता जगदाळे यांनी या सर्व संस्थांचे अभिनंदन तर अपार कष्ट करून प्रत्यक्ष मदत पोहोच करणारे शिक्षक विनोद सुरवसे यांचे भरभरून कौतुक केले आहे. 

 
Top