उस्मानाबाद / प्रतिनिधी  - 

 आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला व सर्व सामान्य जनतेला ,व्यवसाईकाना कुठलीही मदत न करता या अभूतपूर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये सक्तीने वीज बिल वसुली करण्याऱ्या महावसूली सरकारच्या निषेधार्थ ही वसुली थांबविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने धाराशिव येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दि.३० मार्च रोजी तीन दगडे मांडून त्यावर बुक्का फासून, फुले वाहून  व अगरबत्ती लावून तिघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. 

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला कुठलीही मदत न करता या विदारक परिस्थितीमध्ये सक्तीने वसुली करणाऱ्या जुलमी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विद्युत वितरण कंपनीने सक्तीची वसुली सुरु केली आहे,त्यामुळे या महावसुली आघाडी सरकारचा निषेधार्थ हाती फलक घेत घोषण ने  परिसर दनानून सोडला ,विद्युत वितरण कंपनीने सक्तीची वसुली सुरु केली आहे. त्यामुळे या महावसुली आघाडी सरकारचा निषेधार्थ हाती फलक घेत मोठमोठ्याने घोषणा देत या सरकारचा निषध नोंदवित कोणत्याही परिस्थितीत वीज बिल माफ झालीच पाहिजे यासह इतर घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजाला हक्काचा पिकविमा अजूनही मिळालेला नाही. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि शेतमालाचे अस्थिर भाव याचा सामना करत असलेल्या शेतकऱ्याला वेठीस धरून वीज बिलाची वसुली करण्यासाठी सर्रास सबस्टेशन व फिडर बंद करण्याची मोहीम चालू आहे. एकाही शेतकऱ्याने चालू बिल भरले असेल तर त्याला वीज पुरवठा करणे बंधनकारक असूनदेखील सरसकट वीज कापणीचे नियमबाह्य अभियान राबविले जात आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी वीज तोडणीला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली आणि शेवटच्या दिवशी मात्र ही मोहीम पूर्ववत सुरु ठेवण्याचे निवेदन ऊर्जा मंत्र्यांनी केले. मंत्री मंडळाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे वरिष्ठांचे सक्त आदेश आहेत हे सांगत महावितरणचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी आपली हतबलता व्यक्त करत आहेत. जनतेची अशी फसवणूक करणाऱ्या विश्वासघातकी सरकारबाबत जनसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनआंदोलनाला मर्यादा येत असल्या तरी नियमांचे योग्य पालन करून प्रत्येक गावात आणि खास करून महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची प्रतीकात्मक होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलनात भाजपा किसान मोर्चाचे रामदास कोळगे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, शहराध्यक्ष राहुल काकडे, प्रवीण पाठक, जीवन वाठवडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी,  जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, संदीप इंगळे,  गिरीश पानसरे, सुजित साळुंके सुरज शेरकर ,प्रीतम मुंडे ,हिंमत भोसले ,राज निकम ,गणेश एडके ,सदानंद अकोसकर ,गणेश इंगळगी ,प्रसाद मुंडे ,निरंजन जगदाळे आदीसह युवामोर्चा  कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

 
Top