परंडा / प्रतिनिधी : -

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांचा महाविद्यालयास नॅकचा अ दर्जा प्राप्त झाल्यामुळे जिजाऊ ब्रिगेड परांडा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभाच्या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष आशा मोरजकर, परंडा तालुका अध्यक्षा अर्चना भांडवलकर, परंडा तालुका सचिव डॉ.तेजस्विनी करळे, तालुका उपाध्यक्ष अपेक्षा पाटील, सदस्य कल्पना मोरे आणि आकांक्षा घोगरे आदी कार्यकर्त्या या वेळेस उपस्थित होत्या. महाविद्यालयास अ दर्जा प्राप्त झाला आणि महाविद्यालयांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.तेव्हा पुढील पाच वर्षासाठी  महाविद्यालयाने  केलेला आहे.प्लान प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सांगितला.या महाविद्यालयांमध्ये आणखीन गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या अत्यावश्यक सोयी सुविधा संस्थेच्या मार्फत  उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी सांगीतले उस्मानाबाद जिल्ह्यामधील एक मात्र हे महाविद्यालय आहे जिथे विद्यार्थ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले साधन सामुग्री उपलब्ध करून  प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केली.

या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले केवळ सात वर्षांमध्ये दोन नॅक या महाविद्यालयाचे झाले त्याचे श्रेय प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांना जात आहे.महाविद्यालयांमध्ये प्राचार्य डॉक्टर दीपा सावळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्राध्यापकांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावल्यामुळे आणि सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांकडून कामे करून घेतली त्यामुळे या महाविद्यालयास अ दर्जा प्राप्त झाला आहे. 

 
Top