तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी  मंदीर संस्थानच्या वतीने प्रथमच  भाविकांच्या  सोयीसाठी श्री तुळजाभवानी मंदीराच्या राजे शहाजी महाध्दार समोरील दगडी  पायऱ्या वर  मंडप मारल्याने   मंदीरात प्रवेश करताना आता भाविकांचे पाय पोळण्याची गैरसोय दूर झाली आहे.

तसेच प्रतिवर्षा प्रमाणे  मंदीरातील  राजेशहाजीमहाध्दार ते निंबाळकर दरवाजा तसेच  प्रदक्षणा मार्गावरही पडदे  मारुन सावली निर्माण केल्याणे उन्हापासुन व पाय पोळण्या पासुन भाविकांची आता सुटका होणार आहे.

 उन्हाळा चा पार्श्वभूमीवर सध्या श्रीतुळजाभवानी मंदीर समोर असणारी दगडी पायऱ्या उन्हाच्या तीव्रतेने गरम होत होत्या. यामुळे मंदीरात प्रवेश करताना भाविकांना  दगडी पायऱ्या वर बसणारे उन्हाचे चटके सहन करीत मंदीरात जावे लागत होते. याची दखल मंदीर प्रशासनाने घेवुन शुक्रवार रोजी श्रीतुळजाभवानी मंदीर राजेशहाजीमहाध्दार समोरील पायऱ्या वर मंडप मारल्याने भाविकांना या दगडी पायऱ्या वर उन्हाचे चटके न बसल्याने मंदीर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी केलेल्या या उपाययोजना बद्दल मंदीर प्रशासनाचे आभार मानले.तसेच  मंदीर परिसरात ही हिरवे पडदे मारुन  सावलीची सोय प्रतिवर्षा प्रमाणे  केली आहे.

 
Top