उस्मानाबाद / प्रतिनिधी:-

 प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण संचलनालय, जिल्हा परिषद उस्मानाबाद, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाने सध्या ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’ महाराष्ट्रात ताकतीने राबविले जात आहे. या अभियानामध्ये उस्मानाबाद शहरातील लिटल स्टार प्राथमिक शाळेने जिल्हातील पहिली तंबाखूमुक्त शाळा होण्याचा मान पटकावला आहे.

उस्मानाबाद जिह्यात हे अभ्यान राबविण्यासाठी  जिल्हाधिकारी,  विशेष न्याय दंडाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. या अभियानात उस्मानाबाद जिल्हा व तालुक्यातील लिटल स्टार  प्राथमिक शाळाने बाजी मारत उस्मानाबाद जिह्यातुन  पहिला क्रमांकात तंबाखूमुक्त शाळेचा मान पटकावला आहे. याबाबत सलाम मुंबई फाउंडेशनने दोन वर्षांसाठी प्रमाणपत्र दिले आहे. यासाठी सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक संदेश देवरुखकर, श्री. स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सलाम  मुंबई फाउंडेशनचे समन्वयक राहुल खरात यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्यध्यापक दीपक मारुती भांगे सर यांच्या पुढाकाराने आम्रपाली कांबळे, राखी झोरे, महेश इंगळे,  स्वाती रेगुडे,  संगीता डोके यांच्या प्रयत्नाने व आमचे इतर शिक्षकवृंद शिवनंदा पांचाळ,  रेवती शिवणीकर,  रेणुका पाटील,  ज्योती चौधरी,  शुभांगी गाडगीळ, तनुजा वाघमारे, शिक्षकेत्तर कर्मचारी संजय लांडगे यांच्या सहकार्याने शाळा तंबाखूमुक्त झाली.  

भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचनेनुसार व आरोग्य विभाग आयुक्तालयाने पारित केलेले तंबाखूमुक्त शाळेचे सुधारीत 9 निकष लिटल स्टार प्राथमिक शाळा उस्मानाबाद  शाळेने पूर्ण केले आहेत. उस्मानाबाद जिह्यातील व तालुक्यातील पहिली  तंबाखूमुक्त शाळा घोषित झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी उध्दव सांगळे,  गटशिक्षणाधिकारी  रोहिणी कुंभार मॅडम, केंद्रीय  मुख्याध्यापक शंकर घंटे, केंद्रप्रमुख जाकते यांच्यासह पालकांनी शाळेचे कौतुक केले आहे.

 
Top