उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 गतवर्षी ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक पूल वाहून गेले होते. ते पूल दुरुस्त करण्यासाठी खासदार ओमराजे शिवसेना आमदार प्रा. तानाजी सावंत, आमदार कैलास पाटील तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार या पुलांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १३ पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देत ३७ कोटी १५ लाखाचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

यात उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ उस्मानाबाद ते उपळा (मा.) मार्गावर बुडीत पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी १४ लाख, सारोळा ते शिंदेवाडी मार्गावरील पुलासाठी १ कोटी ४९ लाख, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग-चिकुंन्द्रा - किलज रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ३६ लाख, रा.म.मा ६५ ते मुळेवाडी शेटे तांडा रस्त्यावरील बुडीत पुलाचे बांधकाम करणे- १ कोटी ७६ लाख, कळंब तालुक्यातील प्रजिमा-१९ ते निपाणी-पाडोळी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ३ कोटी २८ लाख, भोसा ते गौर माळी वस्ती येथे उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ९१ लाख, कोथळा ते गायरान वस्ती उच्चस्तरीय पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५९ लाख, रा.मा.२३६ हिंगणगाव-आवाड शिरपुरा-सौंदनणा रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ३ कोटी ९१ लाख, भूम तालुक्यातील तित्रज ते मुरूमकर वस्ती-साबळे वस्ती या मार्गावर उच्चस्तरीय पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ४६ लाख, परंडा तालुक्यातील प्रतिमा-१ ते श्रीधरवाडी-मस्केवस्ती रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ८ लाख, रा. मा. २१० ते इनगोंदा- वाटेफळ- लोणारवाडी-तांदुळवाडी-कोकरवाडी जिल्हा सरहद्द या मार्गावर बुडित पूलाचे बांधकाम करणे ५ कोटी ४३ लाख, लोहारा तालुक्यातील प्रतिमा -४१ ते कमालपूर रस्त्यावर उच्चस्तरीय पुलाचे बांधकाम करणे ४ कोटी २८ लाख, उमरगा तालुक्यातील टी-९ ते कोथळी मार्गावर उच्चस्तरीय पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ३४ लाख असा निधी मंजूर झाला आहे.

 
Top