तेर / प्रतिनिधी

 तेर ता.उस्मानाबाद येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या  रिक्त झालेल्या जागेसाठी नवीन उपसरपंच निवडीसाठी  उस्मानाबाद चे  तहसीलदार गणेश माळी यांनी  निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यासाठी शुक्रवारी दि. 26 मार्च  2021 रोजी ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलाविण्यात आली आहे.इच्छुकांची संख्या जास्त असली आ.राणा जगजितसिंह पाटील ठरवतील तोच उपसरपंच पदावर बसणार आहे.

 उपसरपंच बाळासाहेब कदम यांना पक्षश्रेष्ठी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले होते. 5 जानेवारी रोजी उपसरपंचानी दिलेल्या राजीनाम्याची सदस्यांच्या बैठकीत खातरजमा करून मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठवला होता.

आँक्टोबर 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनंतर बाळासाहेब कदम यांची पक्षश्रेष्ठींनी उपसरपंच पदावर निवड केली होती. कदम यांनी सरपंच पदाचा प्रभारी कारभारही सांभाळला होता.आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थक सदस्यांची संख्या 15 असून त्यामध्ये 7 पुरुष  व  8 महिला सदस्यां आहेत. तर विरोधी गटाचे केवळ दोन सदस्य निवडून आले आहेत आहेत त्यामुळे  आ.राणा जगजितसिंह पाटील सांगतील तोच उपसरपंच पदावर बसणार आहे. दरम्यान उस्मानाबाद तालुका निवडणूक विभागाने याबाबत आदेश काढून तेर महसूल मंडळ विभागाचे मंडळ आधिकारी  अनील तिर्थकर यांची अध्यासी आधिकारी म्हणून  नेमणूक केली आहे.


 
Top