उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  164 नवीन रुग्ण सापडले असून त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 45 तर कळंब तालुका 59 व  उमरगा तालुक्यातील 15 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 663 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना वाढत असताना जिल्हाधिकारी व प्रशासन कडक निर्बंध लावायला आणखी कशाची वाट पाहत आहे हा प्रश्न विचारला जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 40 हजार 757 नमुने तपासले त्यापैकी 18 हजार 223 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 14.13 टक्के आहे. जिल्ह्यात 16 हजार 971 रुग्ण बरे झाले असून 93.13 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 589 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.23 टक्के मृत्यू दर आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 45 रुग्ण , तुळजापूर 9, उमरगा 15, लोहारा 4, कळंब 59 , वाशी 7, भूम 11 व परंडा तालुक्यात 14 रुग्ण सापडले आहेत

 
Top