कळंब  / प्रतिनिधी:       

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जि.प. प्रा.शा.लमाणतांडा ( शिराढोण )ता. कळंब. या शाळेस जोशाबा शिक्षक सहकारी पतसंस्था कळंबच्या नफा विभागणी रकमेतून सदरील शाळेस ५१६५ रु. विविध शैक्षणिक, साहित्यिक, वैज्ञानिक, थोर महापुरुष, इंग्रजी द्विभाषिक पुस्तके अशा विविध पुस्तकांची भेट शाळा ग्रंथालयासाठी देण्यात आली. यातून निती आयोग निर्देशांकानुसार शाळेचे एक मानांकन पुर्ण केले . तसेच या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा, वाचन संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी मागील तीन वर्षापासून संस्था उपक्रम राबवत आहे. या पुस्तकांच्या मदतीने जि.प. प्रा.शा. लमाण तांडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उद् घाटन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. 

  यावेळी शा. व्य. समितीचे अध्यक्ष श्री.विकास राठोड उपाध्यक्ष . श्रीम. कविता राठोड, ग्राम पंचायत सदस्य श्री. रमेश पवार, शिराढोणचे केंद्रप्रमुख श्री. सय्यद ए.एम. व जोशाबा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. महेंद्र रणदिवे उपाध्यक्ष. श्री. राजकुमार सुरवसे , संचालक श्री. संजय भालेराव , श्री .सचिन भांडे  , शाळेचे मुख्याध्यापक श्री .कडाप्पा आल्टे, स. शिक्षक श्री.सतिश कदम , तसेच गावातील विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

 
Top