उस्मानाबाद / प्रतिनिधी:

मराठी भाषेत प्रतिशब्द संशोधन गरजेचे आहे. यासाठी मराठी शब्दकोष समृद्ध झाला पाहिजे. मराठी भाषेत प्रज्ञावंत पिढी निर्माण झाली पाहिजे. राज्यघटनेत मराठीला राजभाषा म्हणून स्थान आवश्यक आहे, असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष जीवन गोरे यांनी व्यक्त केले. 

मराठी भाषा गौरव दिना निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. तुळजाभवानी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, सचिव बालाजी तांबे, कोषाध्यक्ष सुरेश टेकाळे, सदस्य भा. न. शेळके, सुरेखा जगदाळे, तबस्सुम सय्यद, प्रा. डॉ. शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते. मान्यवरांनी कुसुमाग्रज, बापूजी साळुंखे, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

यावेळी साहित्य संमेलनातील स्वयंसेवक विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. राजा जगताप यांनी मानले.


 
Top