कळंब  / प्रतिनिधी: 

श्री संत गाडगे महाराज चौक नामांतरण संदर्भात मंगळवार दि. २३ रोजी जनस्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळंब तहसीलदार यांना निवेदन देउन मागणी करण्यात आली आहे. 

जनस्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळंब नगरपालिका हद्दीत असलेल्या श्री. संत गाडगे महाराज चौक,  ढोकी रोडवरील असलेल्या देशमुख हाॅस्पीटल च्या नजीक असलेला चौक गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजेच सावरगाव पुनर्वसन झाल्यापासून श्री. संत गाडगे महाराज चौक या नावाने फलक लावले आहेत. परंतु सदरील चौकाचे रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत झालेले नाही. श्री. संत गाडगे महाराज यांनी आजवर केलेले स्वच्छतेचे कार्य हे अनमोल आहे, ते एक थोर समाजसुधारक होउन गेले आहेत.

याकरिता सदरील चौकाचे श्री संत गाडगे महाराज चौक या नावाने रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याची मागणी जनस्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर जनस्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला तालुका सचीव दुर्गाताई शिंदे, अध्यक्ष संगिता संपत थोरात,लक्ष्मी शिंदे, प्रथमेश कांबळे, तुषार बाराते, रमेश पवार, जलस्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते  साहेबराव गायकवाड , मराठवाडा अध्यक्ष बंडू आबा ताटे, कृष्णा जाधव, कुणाल वाघमारे आदींच्या सह्या आहेत.


 
Top