उस्मानाबाद / प्रतिनिधी:

 बामणी (ता.उस्मानाबाद)येथील हनुमान विद्यालय व जिल्हा प्रा. परिषद शाळे मध्ये शिवानंद कथले मित्र परिवाराच्या  वतीने शिवानंद कथले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व बसवेश्वर चरित्र ,मास्क,  शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

प्रारंभी वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबादचे अध्यक्ष शिवानंद कथले यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ, मित्र परिवार  व प्रशालेच्या वतीने  सत्कार करण्यात आला.   या कार्यक्रमास  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे उपाध्यक्ष  हनुमंत भुसारे , माजी प. स. सदस्य दिनेश पाटील , बहुजन महायोद्धा संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे , राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष  नितीन बप्पा शेरखाने ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संचालक लिंबराज  लोकरे, तेली समाज जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, नाभिक समाज महामंडळचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, घिसाडी समाज जिल्हाध्यक्ष संजोग पवार, सरपंच काकासाहेब शेळके, उपसरपंच शंभू तोडकरी , अॅड कांबळे,सुरेश बामणकर, हनुमान विद्यालयाचे मु.अ. राऊत सर ,जि. प. प्रा. शाळेचे मु.अ. कोळगे सर, अभयराज मुंडे, तानाजी धस,जमादार सर, सपकाळ सर , पवार सर, कदम सर , , माने सर, गुळवे सर, गडदे सर, शिंदे सर , धावरे सर व गावातील नागरिक उपस्थित होते.  

 
Top