तेर / प्रतिनिधी

रेशन कार्ड तपासणी फाॅर्ममध्ये बदल करण्याची मागणी आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे.     

   उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महसूल विभागामार्फत सुरू असलेल्या रेशन कार्ड तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड धारक यांच्याकडून “शिधापत्रिका तपासणी नमुना” नावाचा एक फॉर्म भरून घेतला जात आहे .जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड दुकानदार यांनी हे फॉर्म सर्व रेशन कार्ड धारकांना वाटप केलेले आहेत. आणि 50 टक्के फॉर्म भरून माघारी घेतलेले आहेत. मात्र रेशन कार्ड धारक अथवा  रेशन दुकानदार इतकेच काय तर नायब तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीही या फॉर्ममधील हमीपत्र व्यवस्थित पाहिले नाही. आणि सरळ सरळ लोकांनी हमीपत्रावर सही/ अंगुठा चा ठसा करून फॉर्म भरून दिले आहेत.

 या फार्म वरील हमीपत्र खालील प्रमाणे 

मी हमीपत्र लिहून देतो की माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन असेल तर माझे रेशन कार्ड रद्द करण्यात यावे. अशाप्रकारे हमीपत्र लिहून घेतले जात आहे. हे शासनाचे चुकीचे धोरण असून यांच्या विरोधात आम आदमी पार्टी उस्मानाबाद च्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रेशन कार्ड तपासणी नमुना फॉर्म यामधील हमी पत्रात योग्य तो बदल करावा असा विनंती अर्ज करण्यात आला आहे.यावेळी आप’चे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही मागणी केली.


 
Top