उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापकास सहकारी कर्मचाऱ्याचे अंशदान केंद्रीय निवृत्ती योजनेत वर्ग करण्यासाठी एक हजाराची लाच मागून ती स्वीकारताना एसीबीने सोमवारी अटक केली.

गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहुराज दत्तू भोजगुडे (५४ रा. समतानगर) यांच्याकडे तक्रारदाराने त्यांची डीसीपीएस योजनेचे खाते एनपीएस योजनेत वर्ग करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या कामासाठी मुख्याध्यापक भोजगुडे यांनी तक्रारदारास ाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सोमवारी चिखली येथे सापळा रचून एक हजार रुपये पंचासमक्ष स्विकारल्यानंतर मुख्याध्यापक भोजगुडे यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 
Top