उस्मानाबाद/ प्रतिनिधी
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत तत्काळ रद्द करावेत, किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा, इंधन दरवाढ कमी करावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.८) शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक ना अनेक बाबींमुळे शेतकरी, सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यामुळे किमान आधारभूत किमतीचा कायदा करा, इंधन दरवाढ किमान पातळीवर आणा, सक्तीची वीजबिल वसुली थांबवून कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस भाई धनंजय पाटील, शेकाप मध्यवर्ती समितीचे सदस्य प्रा. अमोल दीक्षित, भाई बाळासाहेब धस, विनायक शेटे, अनिकेत देशमुख, बाबुराव जाधव, दिगंबर घाटराव, सचिन चौरे, महादेव गायकवाड, रामलिंग घुले, भारत सुतार, संभाजी गायकवाड, अॅड. केदार भोसले, पोपट शिंदे आदी सहभागी झाले.