उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

तालुक्यातील शिंगोली येथे ‘माझं गाव सुंदर गाव’ अभियानास ग्रामस्थांनी गावातील स्वच्छता करून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. 

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव सुंदर गाव’ या अभियानाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. स्वच्छ आणि सुंदर गाव तसेच गावातील लोकांमध्ये एकीची भावना निर्माण करणे हा उद्देश ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातंर्गत गावची सर्व पातळीवर स्वच्छता करणे, ग्रामपंचायत कार्यालय सुंदर बनवणे, आरोग्यविषयक सुधारणा करणे, पर्यावरण व वृक्ष संवर्धन करणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत विविध स्तरावर नावीन्यपूर्ण बाबी करणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेत अभियानाची सुरुवात म्हणून गाव व शाळेचा परिसर स्वच्छ केला.

यावेळी दौलतराव माने, ग्रामसेवक लाटे  , मुख्याध्यापक म्हेत्रे सर, अंगणवाडी सेविका, बचतगटाच्या महिला व गावकरी सर्वांनी उपस्थित राहून अभियानात सहभाग घेतला.

 
Top