तुळजापूर /प्रतिनिधी--
तालुक्यातील राजकिय दृष्टिने महत्त्वपूर्ण व सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जळकोट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस मनसे शिवसेना राष्ट्रवादीकाँग्रेस प्रणित महाआघाडी गावविकास पॅनलचे प्रमुख अशोकराव पुंडलीकराव पाटील यांची तर उपसरपंचपदी सदर पॅनलच्याच सदस्य असलेल्या सौ श्रीदेवी बसराज कवठे यांची बिनविरोध निवड झाल्याने महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेप्रमाणे दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याच्या वेळेस सरपंच पदासाठी अशोकराव पुंडलिकराव पाटील यांचा तर उपसरपंच पदासाठी सौ श्रीदेवी बसवराज कवठे यांचा अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी अभंग गायकवाड व सहाय्यक ग्रामविकास अधिकारी कोकाटे यांनी दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीच्या सर्व 11 सदस्यांच्या उपस्थितीत सरपंचपदी अशोकराव पाटील तर उपसरपंचपदी श्रीदेवी कवठे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. याप्रसंगी विरोधी पॅनल बहुजन गावविकास आघाडीचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. याप्रसंगी चे जिपसदस्य काँग्रेस प्रशजगतिप मनसे जिल्हाअध्यक्ष प्रशांत नवगिरे तलाठी तात्यासाहेब रुपनर, ग्रामपंचायत कर्मचारी नागू स्वामी,विशाल जाधव, लहु कार्ले, दत्ता शिंदे, अनिल पासोडे, विशाल साखरे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.